प्रतिनिधी / नंदगड : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गर्बेनहट्टी यांच्या वतीने झुंजवाड के.एन. गावात दुर्गादौड काढण्यात आली. यात अनेक युवक व युवतीनी सहभाग दर्शवला होता. गावातील प्रत्येक गल्यातून दौड काढण्यात आली. ठिकठिकाणी भगव्या ध्वजाला आरती ओवाळण्यात आली. गावच्या वेशीत
गावातील प्रमुख पंच, युवक व महिला मंडळानी दौडीचे स्वागत केले. शेवटी लक्ष्मी मंदिराजवळ आरती होऊन दौडीची सांगता झाली.
नवरात्रीनिमित्त गावातील विठ्ठल रुक्माई मंदिरात रोज भजन व नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला वारकरी व नागरीकांचा मोठा सहभाग लाभत आहे.तर ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरात तसेच कलमेश्वर मंदिरात महिला मंडळाकडून लोकगीते व भक्ती गीते सादर केली जात आहेत. त्यामुळे गावात भक्तीमय वातावरण पसरले आहे.









