वार्ताहर/नंदगड
झुंजवाड के. एन. गावात एक दिवस दौड काढण्यात येते. गर्बेनहट्टी, बेकवाड, हडलगा, कुणकीकोप येथून धारकरी दौडीत सहभागी झाले होते. झुंजवाड गावच्या महिला व नागरिकांकडून गावच्या वेशीत दौडीचे ध्वज पूजन करून उत्साही स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील विविध गल्ल्यांतून दौड नेण्यात आली. कलमेश्वर मंदिरासमोर दौडीची सांगता करण्यात आली.









