गोव्यातील शास्त्रपरंपरेत आणखी एक मानाचा तुरा
पणजी : काणकोण तालुक्यातील पैंगिण येथील टेंगसे कुलोत्पन्न तर्करत्न दत्तानुभव (राघव) गुलाब टेंगसे यांनी वेदांत शास्त्रामध्ये संपूर्ण अद्वैतवेदांत शास्त्राची ‘तेनाली’ येथे महापरीक्षा देऊन काल रविवारी दि. 27 रोजी ‘वेदांतरत्न’ ही उपाधी कांची शंकराचार्यांकडून प्राप्त केली. राघवने रिवण-काणकोण येथील ‘श्रीविद्या पाठशाळेत’ महामहोपाध्याय पं. देवदत्त पाटील व पं. राजेश्वरशास्त्री देशमुख यांच्याकडे न्यायशास्त्राचे अध्ययन पूर्ण करून चेन्नईमध्ये राहून महामहोपाध्याय पं. मणिद्राविड गुऊजींच्याकडे वेदांत शास्त्राचे अध्ययन पूर्ण केले. संपूर्ण भारतामध्ये दोन शास्त्रामध्ये महापरीक्षा देणारे अंगुलीगणनीय आहेत. त्यामध्ये राघव हा एक. दीपावलीच्या पूर्वसंध्येला या यशाबद्दल सर्व स्तरांवर त्याचे अभिनंदन होत आहे.









