कसबा बीड :
कोगे (ता. करवीर ) येथील दत्त मंदिरात महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी केली होती, तर कसबा बीड येथील महादेव मंदिर परिसरात असलेले दत्त मंदिर, व महे येथील दत्त मंदिर व पाडळी खुर्द येथील मुख्य चौकातील दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्रीक्षेत्र प्रसिद्धीस येत असलेल्या कोगे येथील पंत महाराज मंदिर व तेथील शेजारी असणारे दत्त मंदिरात सकाळी पहाटेपासून जन्मकाळ संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली . दत्त जन्म काळानंतर खिचडी वाटप मंदिरात भक्तांकडून वाटप करण्यात आले तसेच जेष्ठ दत् भक्त गोविंद दतात्रय मोरे (कोगे)यांचे घरी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दत्त जयंती निमित्ताने तालुक्यातील अनेक दत्त मंदिरांमध्ये आसपास गावातील अनेक भाविकांनी दत्ताचे दर्शन घेतले पहाटे पाच वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती. श्री दत्त जन्म काळाच्या वेळी मंदिरात परिसर फुलांनी भरून गेला, आज भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. अनेक मंदिरामध्ये पहाटे काकड आरती, मंगल आरती, दुपारी महापूजा, नैवेद्य, महारती झाली त्यानंतर महाप्रसादांच्या अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी उद्या महाप्रसाद मोठ्या प्रमाणात होणार आहे. सर्व मंदिराच्या मुख्य गाभार्यामध्ये आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. वाहतूकीस अडचण येऊ नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला होता.आरोग्य विभागाकडून शिबीरांचे आयोजन केले होते. अनेक ठिकाणी छोट्या विक्रेत्यांनी खेळण्याची, खावूची, प्रसादाची दुकाने थाटली होती. दिवसभरातसर्व भक्त मंडळी दत्त नामस्मरणात गुंग होऊन गेली होती.








