पासवर्ड त्वरित बदलण्याचा कंपनीचा इशारा
नवी दिल्ली
‘मेटा’ने शुक्रवारी 10 लाख फेसबुक वापरकर्त्यांची माहिती पासवर्डसह लीक होण्यासंबंधी महत्त्वाचा इशारा जारी केला. थर्ड पार्टी ऍप्सच्या माध्यमातून यूजर्सचा हा डेटा लीक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने यूजर्सना ताबडतोब पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही वर्षांत फेसबुकचा डेटा लीक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर युजर्सच्या गोपनीयतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा डेटा चोरीचे प्रकरण समोर आले आहे. या वषी आतापर्यंत ‘मेटा’ने 400 हून अधिक ऍप्लिकेशन्स ओळखले आहेत, असे कंपनीचे अधिकारी डेव्हिड ऍग्रॅनोविच यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितले. हे ऍपल आणि गुगल ऍप स्टोअरवर सहज उपलब्ध आहेत.









