22 ते 29 मार्चपर्यंत रंगणार महोत्सव ; आठ मंडळांचा सहभाग
माणगाव / प्रतिनिधी
माणगाव ग्रामस्थांच्यावतीने 22 ते 29 मार्च या कालावधीत माणगाव बाजार येथे दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोज सायंकाळी 7 वाजता नाटकाला प्रारंभ होणार आहे. हा महोत्सवात दशावतारातील नामवंत मंडळांचा समावेश आहे.यातील मंडळ व सादर करण्यात येणारे कथानक पुढील प्रमाणे आहे. 22 मार्च रोजी मोरेश्वर दशावतार मंडळ (मोरे ) वेडा चंद्रहास, 23 रोजी जय हनुमान मंडळ (आरोस ) नल दमयंती, 24 रोजी चेंदवणकर मंडळ ( कवठी,सुधाकर दळवी प्रस्तुत ) यमाचे लग्न , 25 रोजी आजगावकर मंडळ ( आजगाव ) श्रीयाळ चांगुणा, 26 रोजी चेंदवणकर मंडळ (चेंदवण , देवेंद्र नाईक प्रस्तुत ) रती मदन, 27 रोजी माऊली मंडळ (इन्सुली )दक्ष यज्ञ, 28 रोजी कलेश्वर मंडळ ( नेरूर ,बाबी कलिंगण प्रस्तुत ) ययाती देवयानी, 29 रोजी नाईक मोचेमाडकर मंडळ ( मोचेमाड ) राखणदार अशी नाटक होणार आहेत. दशावतार कलाप्रेमींनी या महोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन माणगाव ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.









