न्हावेली / वार्ताहर
उत्कर्ष सेवा मंडळ,कट्टा-कॅार्नर,न्हावेली व ग्रामस्थ आयोजित १७ एप्रिल पासून दशावतारी नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार १७ रोजी रात्री ८ वाजता उद्घाटन,त्यानंतर ९ वाजता ( भाई कलिंगण प्रस्तुत ) कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ,नेरुर यांचा नाट्यप्रयोग,शुक्रवार १८ रोजी रात्री ९ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ,सिंधुदुर्ग यांचा नाट्यप्रयोग,शनिवार १९ रोजी जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ,मातोंड पेंडूर यांचा नाट्यप्रयोग,रविवार २० रोजी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी महाप्रसाद,व रात्री भजनाचा कार्यक्रम,त्यानंतर ( देवेंद्र नाईक प्रस्तुत ) चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांचा नाट्यप्रयोग होणार आहे लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Previous Articleमालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नियुक्ती होणार
Next Article आचरा बौद्ध विकास मंडळाची कार्यकारिणी जाहीर









