न्हावेली / वार्ताहर
न्हावेली येथील उत्कर्ष कला क्रिडा सेवा मंडळ,न्हावेली कट्टा कॅार्नर व ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या चार दिवस चालणाऱ्या नाट्यमहोत्सवाला उंदड प्रतिसाद मिळाला.या नाट्यमहोत्सावाचे उद्घाटन शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत धाऊसकर,उपाध्यक्ष लक्ष्मण परब हरि वारंग,शिवसेना शिंदे गट मळगाव उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर,माजी सरपंच शरद धाऊसकर,न्हावेली ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शिंदे गट उपविभागप्रमुख सागर धाऊसकर सदस्य स्नेहा पार्सेकर,मातोंड पेंडूर तंटामुक्ती अध्यक्ष उमेश सावंत,आनंद नाईक,माजी मुख्याध्यापक सखाराम मोर्ये,चंद्रकांत पार्सेकर,गंगाराम नेमण,मुख्याध्यापक सौ.स्मिता नाईक पोलिस पाटील सावळाराम न्हावेलकर,विनायक कालवणकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोहन नाईक,दिपक नाईक,मनोहर दळवी तसेच मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.









