न्हावेली / वार्ताहर
Dashavatar Natyamahotsava organized from 19th to 21st April in Nhaveli
श्रीदेवी माऊली युवक कला क्रिडा सेवा मंडळ, चौकेकरवाडी आयोजित माऊली रंगमंच न्हावेली चौकेकरवाडी जि.प. शाळा नं१ जवळ येथे १९ ते २१ रोजी दशावतार नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. बुधवार १९ रोजी सायंकाळी ७ वाजता नाट्यमहोत्सवाचे उद्धाटन कार्यक्रम रात्री ८ वाजता मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे यांचा “ गोकुळचा चोर “ गुरुवार २० रोजी रात्री ८ वाजता श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारिवडे यांचा “ विधीलेख “ शुक्रवार २१ रोजी सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण महापूजा , सायंकाळी ६ वाजता स्थानिकांची भजने त्यानंतर रात्री ८ वाजता श्री दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा “ स्वामी अन्नपूर्णा “ हा नाट्यप्रयोग होणार आहे . तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे .









