ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्राच्या राजकारणात कालचा म्हणजेच बुधवार दि. ५ ऑक्टोबरचा दिवसअभूतपूर्व होता. शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात प्रथमच दोन ठिकाणी दसरा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) बांद्रा BKC मैदानावर मेळावा पार पडला. दोन्ही गटाकडूनही गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर ३ हजार बसेस बुक केल्या होत्या. दरम्यान, मेळावावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित जनतेसमोर नतमस्तक होत आपल्या भाषणाला सुरुवात केली त्यानंतर शिंदे गट, मोदी, अमित शाह यांच्यावरही ठाकरेंनी टीका केली.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, तुम्ही साथ, सोबत भक्कपणाने दिलेलीच आहे. ही तुमच्या मनातील आग आहे, या आगीतून उद्या शिवसेनेचे वणवा पेटणार आहे. त्यात सर्व गद्दारांची गद्दारी रावणासारखी जळून भस्म होणार आहे. जसं मी माझ्या पित्यांना शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसेच तुम्हाला मी वचन देतोय. तुम्ही साथ, सोबत भक्कपणाने दिलेलीच आहे. ही तुमच्या मनातील आग आहे, या आगीतून उद्या शिवसेनेचे वणवा पेटणार आहे. त्यात सर्व गद्दारांची गद्दारी रावणासारखी जळून भस्म होणार आहे. तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
हे ही वाचा : PM नरेंद्र मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांची केंद्रात वर्णी
पाच वर्षं आम्ही तुमच्याबरोबर होतो, तेव्हा अशोक चव्हाणांना कसे जाऊन भेटले होतात, याचा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनीच केलेला आहे. आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजी नगर केलं नाही, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत असताना ते मी केलेलं आहे. जे शिवसेनाप्रमुखांचं वचन होतं ते मी पूर्ण केलेलं आहे. आम्ही काय हिंदुत्व सोडलं, उलट त्यांना घेऊन आम्ही हिंदुत्व वाढवत होतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवरही जोरदार हल्ला चढवलाय.
एका अर्थी झालं ते बरं झालं. बांडगुळं सगळी छाटली गेली, बांडगुळं आपल्या फांद्यांवरती आपण पोसत होतो. पण त्या बांडगुळांच्या एक गोष्ट लक्षात आलेली नाही. बांडगुळांची मुळं ही वृक्षाच्या फांदीत असतात. पण वृक्षाची मुळं ही जमिनीमध्ये असतात. ती जमिनीमध्ये रुजलेली आहेत. पण बांडगुळाला स्वतःची ओळख नसते. कोणी असं विचारलं तर तो सांगू शकत नाही, तू कोणी मी बांडगूळ, कोणी तरी म्हटलं त्यांना बांडगूळ सेना म्हणा, त्यांना मी म्हटलं त्यांचा मी अपमान करू शकत नाही. त्यांना आता शिंगावर घेऊन प्रत्येक निवडणुकीत पाणी पाजावं लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्यावर विजय मिळवून दाखवावाच लागेल, असंही ते म्हणालेत.