वृत्तसंस्था/मुंबई
आगामी इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामासाठी मुंबई सिटी एफसी संघाने 19 वर्षीय फुटबॉलपटू सुप्रतिम दासबरोबर नुकताच नवा करार केला आहे. सदर माहिती मुंबई सिटी संघाच्या व्यवस्थापकाकडून देण्यात आली.
मुंबई सिटी व दास यांच्यात हा नवा करार तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे. त्यामुळे दास 2027 पर्यंत इंडियन सुपरलिग स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधीत्व करेल. दास हा मध्यफळीतील तरबेज फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. 2018-19 च्या फुटबॉल हंगामात उपकनिष्टांची आयलिग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात दासची कामिगीरी दर्जेदार झाली होती









