वृत्तसंस्था / ढाका
पुढील महिन्यात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सोमवारी बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्याच संघाची घोषणा केली असून या संघात लिटन दासचे पुनरागमन झाले आहे. या आगामी मालिकेसाठी बांगलादेश संघामध्ये पाच बदल करण्यात आले आहेत.
बांगलादेश संघातील अनुभवी मेहमुदुल्ला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती यापूर्वीच पत्करली. तर मुश्फिकुर रहीमने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय यापूर्वीच घेतल्याने या दोन अनुभवी खेळाडूंच्या जागी दुसऱ्या दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बांगलादेश टी-20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी लिटन दासची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. लिकडच्या कालावधीत लिटना दास फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. त्याने न्यूझीलंड आणि विंडीज दौऱ्यात 8 वनडे सामन्यातून केवळ 35 धावा जमविल्याने त्याला चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी वगळण्यात आले होते. लंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी बांगलादेश संघात मोहम्मद नईम, शमीम हुसेन, तन्वीर इस्लाम, हसन मेहमुद, नईम या चार नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
उभय संघातील पहिला वनडे सामना 2 जुलै, दुसरा सामना 5 जुलै आणि तिसरा सामना 8 जुलै रोजी होण्ईल. या मालिकेतील पहिले दोन सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर तर शेवटचा सामना पल्लीकेली येथे खेळविला जाईल.
बांगलादेश वनडे संघ- मेहदीहसन मिराज (कर्णधार), तानझीद हसन, परवेज हुसेन, इमॉन, मोहम्मद नईम, नजमुल हुसेन शांतो, टी. रिदॉय, लिटन दास, जाकेर अली, शमीम हुसेन, रिशाद हुसेन, तन्वीर इस्लाम, मुस्तफिजुर रेहमान, तानझीम हसन, तस्कीन अहमद, नाहीद राणा आणि हसन मेहमुद









