वेंगुर्ले (वार्ताहर)-
प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत शासन स्तरावर घेण्यात आलेल्या तृणधान्य पाककला स्पर्धेत परुळे केंद्राच्या दर्शना निलेश नानचे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर आरवली केंद्राच्या प्राची प्रवीण मेस्त्री यांनी द्वितीय व वेंगुर्ला केंद्राच्या डॉ. सई संजीव लिंगवत यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
वेंगुर्लेतील रा. कृ. पाटकर हायस्कुलच्या ज्युबिली हॉलमध्ये घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत शासन स्तरावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धेचे उदघाटन वेंगुर्ले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सुनिता भाकरे, परीक्षक वेंगुर्ला मॅक्स फुड लॅबचे संचालक गजानन पारकर, आरोग्य विभाग परीक्षक डॉ. सौ. सुपिया रावळ, कृषि विभाग (प्रभाग समन्वयक) परीक्षक रेखा परूळेकर, रा. कृ. पाटकर हायस्कुलचे मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, सहाय्यक शिक्षिका एम. एम. खरात. रा. सी. रेगे ज्युनियर कॉलजचे प्रा. महेश बोवलेकर, बीआरसी विभागाच्या डाटा ऑपरेटर सौ. तांडेल, उभादांडा केंद्रप्रमुख श्री. अडुळकर, मातोंड केंद्रप्रमुख लवू चव्हाण, पाल केंद्रप्रमुख सौ. कावले, वेतोरे केंद्रप्रमुख- नितीन कदम, वेंगुर्ला केंद्रप्रमुख श्री आव्हाड, विषयतज्ञ श्री. सावंत यांचा समावेश होता.
यावेळी वेंगुर्ले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी, सध्या जंक फुडच्या आहारी सर्रासपणे सर्व मुलांचा कल गेलेला आहे. जंक फुड हे ऑईली असल्याने तसेच ते खाल्ल्याने शरीरावर होणारे परीणाम हे मुलांच्या आरोग्यास अपायकारक ठरतात. मुलांचे अभ्यासावरील लक्ष विचलीत करतात. जंक फुडमुळे झोपही जास्त वाढते. मुलांवर जंक फुड सेवनाने होणारे परीणाम जाणून घेऊन आपल्याकडे पिकणाऱ्या तृणधान्यापासून बनविलेल्या पदार्थांचे सेवक मुलांनी- विद्यार्थ्यांनी करावे .
त्यासाठी विविध स्वरूपाच्या पाककला निर्माण व्हाव्यात आणि त्या पाककला इतरांनाही समजाव्यात. सदर पाककलेचे पदार्थ प्रत्येक माता पालकाने आपल्या पाल्यांना घरी द्यावेत तसेच शालेय आहारात या तृणधान्य पाककलेचे पदार्थ दिले जावेत. हि स्पर्धा स्वरूपात घेण्यात आली असली तरी त्याचा उद्देश प्रत्येक माता- पालकांनी लक्षात घ्यावा. आपला नंबर स्पर्धेत आला किंवा नाही यापेक्षा नवीन पिढी निरोगी रहाण्यासाठी सक्षम घडविण्याचा मानस जनजागृतीपर हा कार्यक्रम घेतला आहे. त्यामुळे नंबर आला नाही. म्हणून कुणीही नाराज होऊ नये असे मार्गदर्शन केले.
या तालुकास्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धेचे परीक्षक म्हणून शासनाने सुचित केलेल्या तीन विभागाचे वेंगुर्ला मॅक्स फुड लॅबचे संचालक गजानन पारकर, आरोग्य विभाग परीक्षक डॉ. सौ. सुप्रिया रावळ, कृषि विभाग (प्रभाग समन्वयक परीक्षक रेखा परूळेकर यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत शिरोडा, म्हापण, पाल, परूळे, सुरंगपाणी, होडावडा, मठ आरवली, उभादांडा, तुळस, वेतोरे, मातोंड, कोचरा व वेंगुर्ला या १४ केंद्रातून स्थानिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या स्पर्धकांचा सहभाग होता. यात केंद्रनिहाय अनुक्रमे- नाचणी शिरवळे, भरडधान्य पोळ्या, नाचणी शिरवळे, ज्वारी आप्पे, नाचणी सतु ज्वारी आप्पे, मोमो मोदक, भरडधान्य थाळी, कॉर्न पिझ्झा, ओटस फोटीस चीज कप, ज्वारी आप्पे, गोड आप्पे, नाचणी घावण, तृणधान्य कबाब असे पाककलेचें पदार्थ स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेले होते.
या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धक महिलांना गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी तसेच अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाशिकारी संतोष गोसावी यांनी तर मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, तर सुत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षिका एम. एम. खरात यांनी मानले.









