सातारा
शहरासह कास परिसरात महाधनेश उर्फ गरुड गणेश (ग्रेट पाइड हॉर्नबिल) या पक्ष्याचे दर्शन झाले. या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन घडल्याने पक्षीप्रेमींसाठी आनंदाचा क्षण आहे. महाधनेश पक्ष्याला मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राजधनेश अशा नावानेही मराठीमध्ये ओळखले जाते. या पक्ष्याचे मूळ अरुणाचल प्रांतातील आहे. काळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या तांबूस रंगांचे आकर्षक रूप आणि मोठ्या चोचीमुळे तो लक्ष वेधून घेतो. आपल्याकडे या पक्ष्याचे क्वचितच दर्शन होते. सातारा शहरात काही ठिकाणी, तर कास पठारावरील पिसाणी येथे तीन महाधनेश पक्ष्यांचे नुकतेच दर्शन घडले.
आपल्याकडे पश्चिम घाटातील घनदाट सदाहरित आणि अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळतो. दाट आणि उंच झाडी असलेल्या ठिकाणी व लोकांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी हा पक्षी राहतो. उंच झाडावरील विविध प्रकारची फळे हे या पक्ष्याचे मुख्य खाद्य आहे. शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून तो उंच झाडाच्या डोलीत बसतो आणि तिथेच घरटे बांधतो. पक्ष्यांना जन्म घालतो.








