एस. आर पाटील ज्युनिअर कॉलेज (पाट) चा विद्यार्थी
वार्ताहर/ कुडाळ
एस. के. पाटील. शिक्षण प्रसारक मंडळ (पाट) एस एल देसाई विद्यालय व एस. आर पाटील ज्युनिअर कॉलेज (पाट) विद्यालयाचा विद्यार्थी दर्शन दशरथ पडते (अकरावी) याने 17 वर्षे वयोगटातील भालाफेक या क्रीडा प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद करीत (47.45 मीटर) राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.पुणे-बालेवाडी येथे सतरा वर्षे वयोगटातील ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आली होती.दर्शन पडते हा निवती-मेढा गावातील विद्यार्थी आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे क्रीडा शिक्षक, संस्था, विद्यालय, पालक, पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.









