नदी-नाल्यांची पाण्याची पातळी घटली, भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार : दरवर्षीपेक्षा यावर्षी सरासरी 60 टक्के पाऊस कमी
खानापूर : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या सर्व पिकांवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला आहे. मुख्यत्वे भातपीक पूर्णपणे सुकून जाण्याच्या मार्गावर आहे. तर तालुक्मयातील सर्वच नदी-नाले, तलावांची पाण्याची पातळी खालावली असून मलप्रभा नदीतील पाणीपातळी एकदम घटल्याने भविष्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. त्यामुळे तालुक्मयावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. दरवर्षीच्या सरासरीपेक्षा यावर्षी आतापर्यंत 60 टक्के पाऊस कमी झाला आहे. मात्र शासनाकडून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांतून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.
सुरुवातीपासूनच तालुक्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली होती. मे महिन्याच्या शेवटास थोडाफार वळिवाचा पाऊस झाला होता. त्यावर शेतकऱ्यांनी आपल्या खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. पेरणीनंतर पिकांची उगवण योग्यप्रकारे झाली होती. मात्र जून महिन्यात पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला होता. जुलै महिन्यात फक्त दहा दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली होती. जून महिन्यापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने तालुक्यातील सर्वच पिके धोक्याच्या स्थितीत आली आहेत. तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांची पातळी घटल्याने नदीपात्रे उघडी पडली आहेत. पात्रातून अगदी कमी पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाऊस कमी झाल्याने जनावरांना यावर्षी हिरवा चाराही म्हणावा तसा मिळत नसल्याने याचा परिणाम दुग्ध व्यवसायावरही होणार आहे. दीपावलीनंतर याचा परिणाम गंभीरपणे जाणवणार आहे. भविष्यात चाऱ्याची समस्याही शेतकऱ्यांना भेडसावणार आहे.
33 टक्केपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्यास दुष्काळ जाहीर
तालुक्यात 31 हजार हेक्टर जमिनीवर भातपीक घेण्यात येते. तर 20 हजार हेक्टरवर ऊसपीक आहे. उर्वरित जमिनीत भुईमूग, रताळी यासह इतर पिके घेण्यात येतात. यावर्षी पाऊसच सरासरीपेक्षा कमी पडल्याने सर्वच पिकांवर परिणाम झाला आहे. शासनाच्या अहवालानुसार 33 टक्केपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाल्यानंतरच दुष्काळ जाहीर करण्यात येतो. यासाठी कृषी आणि महसूल खात्याकडून पिकांचे सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी खात्याचे अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी सांगितले. सध्या पिकांना नदी, कूपनलिकेचे पाणी देऊन पिके जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र भाताला पावसाच्या पाण्याची गरज असल्याने भातपिकाची म्हणावी तशी वाढ झाली नसल्याने यंदा भातपिकात मोठ्याप्रमाणात घट होणार आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
बंधाऱ्यांतून पाणी अडवण्याचे नियोजन सुरू
नदीतील पाण्याची पातळी पूर्णपणे घटल्याने पाटबंधारे खातेही सतर्क झाले आहे. दरवषी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्मयातील बंधाऱ्यांतून पाणी अडवण्यात येते. मात्र यावषी पाऊस अत्यंत कमी झाल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावल्याने यावषी ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तालुक्मयातील सर्वच बंधाऱ्यांतून पाणी अडवण्याचे नियोजन सुरू असल्याचे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्यातही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाणी अडवण्यात येणार आहे. यावषी पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने बंधाऱ्यांतून साठवलेले पाणी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात खानापूर तालुक्मयात पाण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या वातावरणातील बदल पाहता आणि दिवसभर कडक ऊन असल्याने पाऊस होण्याची शक्मयता पूर्णपणे मावळल्याने शेतकरी सध्या हवालदिल बनला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरु लागली आहे









