उमदी :
जत तालुक्यातील उटगी येथील मुल्ला वस्तीवर काल रात्रीच्या सुमारास २० ते ३० जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकला. या दरोड्यात सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
टोळीने घरात घुसून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गलसरी, तसेच लहान मुलांच्या पायातील पैंजण आणि अंगावरील सर्व सोनं-चांदी जबरदस्तीने काढून नेलं. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनेची माहिती गावच्या सरपंच सविता महादेव कांबळे यांना सकाळी मिळताच, त्यांनी उमदी पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली. यानंतर उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास एपीआय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








