दापोली :
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीच्या पाऱ्यात चांगलीच घसरण होत असून थंडीचा पारा गुरुवारी पहाटे १०.५ वरून ९.९ सेल्सिअस इतका खाली घसरला आहे. यामुळे मिनी महाबळेश्वर वासियांना हुडहुडी भरली आहे.
पावसाळ्यानंतर हळूहळू थंडीचा जोर वाढू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रावर त्याचां परिमाण होणार असल्याचे समोर आले आहे. राज्यात तापमानात मोठी घट होताना दिसत आहे.








