ओटवणे | प्रतिनिधी
दाणोली बाजारपेठेतील साटम महाराज समाधी मंदिर येथील वार्षिक जत्रोत्सव रविवारी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूक त्यानंतर आजगावकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समर्थ साटम महाराज ट्रस्टचे विश्वस्त श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी केले आहे.









