१८ तब्बल विद्यार्थ्यांची विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
ओटवणे| प्रतिनिधी
ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखीत देदीप्यमान यश संपादन केले. या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेतील विविध प्रकारात या हायस्कूलच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांकात स्थान पटकावलेअसुन १८ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, ९ विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक तर ८ विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यामुळे या हायस्कूलच्या १४ वर्षाखालील आणि १७ वर्षाखालील अशा एकूण १८ विद्यार्थ्यांची विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हास्तरीय शालेय कि बॉक्सिंग स्पर्धेत यश संपादन केलेले प्रशालेचे विद्यार्थी पुढील प्रमाणे. १४ वर्षाखालील मुलगे – २८ किलो खालील प्रथम – विघ्नेश कृष्णाजी आईर, द्वितीय – सोहम दत्तप्रसाद सावंत, ३२ किलो खालील प्रथम – मयुरेश जानू वरक, द्वितीय -विराज समीर कानसे, ३७ किलो खालील प्रथम – राज काशीराम जंगले, ४२ किलो खालील प्रथम – संजय संतोष पाटील, द्वितीय – सखाराम मनोहर सावंत, ४७ किलो खालील प्रथम – भागू बाजू जंगले, ५७ किलो खालील नवनाथ विठ्ठल लांबर, ६३ किलो खालील प्रथम – प्रज्वल प्रकाश तायशेटे.
१७ वर्षाखालील मुलगे
३५ किलो खालील प्रथम – प्रदीप गंगाराम जंगले, तृतीय – राम सुरेश जंगले, ४० किलो खालील प्रथम – लक्ष्मण सुरेश जंगले, द्वितीय – तुकाराम मधुकर सावंत, ४५ किलो खालील प्रथम – दत्ताराम प्रकाश दळवी, ५० किलो खालील द्वितीय – भगवान सिताराम वरक, तृतीय – संदेश प्रकाश पाटील, ५५ किलो खालील प्रथम – विजय सुरेश जंगले, ६० किलो खालील द्वितीय – हनुमंत लक्ष्मण सावंत,
१४ वर्षाखालील मुली
२४ किलो खालील प्रथम- अपूर्वा अनंत सावंत, द्वितीय – शिवानी सिताराम सावंत, २८ किलो खालील प्रथम – वैदेही महेश कासले, द्वितीय – उत्कर्षा उदय राऊत, ३२ किलो खालील प्रथम – तन्मयी महेंद्र सावंत, ३७ किलो खालील द्वितीय – चिन्मयी गजानन सावंत, तृतीय – राशी बाबली परब, ५१ किलो खालील द्वितीय- अनुष्का आनंद कांबळे.
१७ वर्षाखालील मुली
३५ किलो खालील प्रथम – सुरेखा बिरू काळे, द्वितीय – तनिष्का प्रकाश पाटील, ४० किलो खालील प्रथम – प्रियांका काशीराम जंगले, तृतीय -सलोनी अनंत सावंत, ४५ किलो खालील तृतीय – ऐश्वर्या शामराव पाटील, तृतीय- आर्या गजानन सावंत, ५६ किलो खालील प्रथम – रंजना देवू पाटील, ६० किलो वरील प्रथम – सानिया हुसेन पटेल.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रिडा शिक्षक आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरद नाईक व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.









