शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल १७ गटात प्रथम क्रमांक पटकावला
ओटवणे प्रतिनिधी
जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत दाणोली येथील कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना या शाळेच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील विविध गटात प्रथम क्रमांक पटकाविला. या देदीप्यमान कामगिरीमुळे किक बॉक्सिंग स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या या सतरा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून एकूण ८० स्पर्धक सहभागी झाले होते. १४ वर्षाखालील किक् बॉक्सिंग स्पर्धेत या प्रशालेतील प्रदीप कांता कासले (३२ किलो), भगवान सिताराम वरक (३७ किलो), संदेश प्रकाश पाटील (४२ किलो), सुनील बाबुराव जंगले (४७ किलो), विजय सुरेश जंगले (५२ किलो), तनिष्का प्रकाश पाटील (२८ किलो), प्रियांका काशिनाथ जंगले (३७ किलो), रंजना देवू पाटील (४६ किलो), वैभवी विठ्ठल दळवी (५० किलो) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत १७ वर्षाखालील या प्रशालेतील सखाराम धूळू गोरे (४५ किलो), अमोल धोंडू पाटील (५० किलो), देवू नवलू पाटील (४० किलो), अक्षता गंगाराम जंगले (३५ किलो), आर्या लवू गावडे (४० किलो), साक्षी संतोष लांबर (५० किलो), योगिता देवू पाटील (६० किलो), रिया राजेंद्र गावडे (६० किलो) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर १४ आणि १७ वर्षाखाली या शाळेतील तुकाराम मधुकर सावंत, ऐश्वर्या शामराव पाटील, प्रकाश आनंद गोरे, प्रज्वल प्रसाद बांदेकर, सुनिता शांताराम जंगले या पाच विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक आर. जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे कै बाबुराव पाटेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, ग्रामस्थ, हितचिंतक, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









