Danoli High School Teacher Rohan Patil awarded Konkanratna Award
दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे क्रिडा शिक्षक रोहन गोविंद पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीचा कोकण रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.रोहन पाटील क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे दाणोली हायस्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धा पर्यंत मजल मारून यश संपादन केले आहे.
ओटवणे / प्रतिनिधी









