बेळगाव : वळसा घालून प्रवास करणे टाळण्यासाठी काही नागरिकांचा जीवघेणा शॉर्टकट सुरू आहे. टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट परिसरात बॅरिकेड्स असल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी उलट्या दिशेने प्रवास सुरू आहे. परंतु, समोरून भरधाव वाहने येत असून यामध्ये एखाद्याचा बळी जाण्यापूर्वीच असे प्रकार बंद करणे गरजेचे आहे. काही वर्षांपासून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पहिले रेल्वेगेटवर बॅरिकेड्स घातल्यामुळे टिळकवाडीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी चालकांना पाच मिनिटांचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. तो टाळण्यासाठी उलट्या प्रवासाचा जीवघेणा शॉर्टकट अवलंबला जात आहे. पहिल्या रेल्वेगेटपासून काँग्रेस रोडवर उलट्या दिशेने दुचाकी हाकल्या जात आहेत. मध्यंतरी पोलिसांच्या भीतीने हा उलटा प्रवास बंद होता. परंतु, या ठिकाणी आता रहदारी पोलीस थांबत नसल्याने पुन्हा एकदा शॉर्टकट वापरला जात आहे. काँग्रेस रोडवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. त्याचवेळी एखादे वाहन उलट्या दिशेने आल्यास अपघाताची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. परंतु, एखादा मोठा अपघात झाल्यास बळी जाण्याची शक्यता आहे. बॅरिकेड्स हटवा अशी मोहीम राबविली जात आहे. परंतु, प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बॅरिकेड्स हटविलेले नाहीत. परंतु, येथे कायमस्वरुपी रहदारी पोलिसाची नेमणूक करणे गरजेचे आहे.
Previous Articleपावसाच्या पाण्यामुळे मनपा प्रवेशद्वारावर तळ्याचे स्वरूप
Next Article झाड कोसळून कारचे नुकसान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









