वनखात्याची कार्यवाही : फांद्याही तोडल्या
बेळगाव : काकतीवेस येथे धोकादायक असलेली झाडे आणि फांद्या हटविण्यात आल्या आहेत. वनखात्यातर्फे ही कार्यवाही करण्यात आली आहे. शहर आणि बाजारपेठेत धोकादायक झाडे आणि फांद्या आहेत. नागरिकांना आणि वाहतुकीला ती अडथळा ठरू लागली आहेत, अशी धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत वनखात्याने झाडे हटविण्याचे काम हाती घेतले आहे. मंगळवारी काकतीवेस रोडवर धोकादायक झाडे आणि फांद्याही तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वादळी पावसामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याची दखल घेत वनखात्याने धोकादायक झाडे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे.









