प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणारी धोकादायक झाडे हटविण्यात आली. जुन्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोर असणाऱ्या सरकारी वकील कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटण्यात आल्या.
या कार्यालयासमोरील रस्त्यावरून नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. तर शेजारी लोकायुक्त एस. पी. कार्यालय आहे. सदर झाड धोकादायक असल्याचे लक्षात घेत वनखात्याकडून झाडाच्या फांद्या छाटण्यात आल्या. दुसरा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुटी असल्याचे लक्षात घेत यंत्राच्या साहाय्याने झाड हटविण्याचे प्रक्रिया सुरू होती.









