खड्डे बुजविण्यापेक्षा डांबरीकरण करण्याची मागणी
मजगाव : पिरनवाडी गावच्या मुख्य रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडलेले होते. त्यासाठी वारंवार तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी किणये ते पिरनवाडीपर्यंत व उद्यमबाग-मजगाव क्रॉसपर्यंत सदर खड्ड्यांमध्ये मोठी खडी घातल्याने ती खडी इतरत्र पसरलेली आहे. या पसरलेल्या खडीमुळे चारचाकी आणि दुचाकीधारकांना त्रास होत आहे. शिवाय ती खडी चारचाकी व दुचाकीच्या चाकाला लागून इतरत्र फेकली जात असल्याने नजीकच्या नागरिकांना व वाहतुकदारांना ती खडी उडून दुखापत होण्याची भीती निर्माण झाली आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित पाहणी करून सर्व खड्डे बुजवून डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी जागरुक नागरिकांतून केली जात आहे.









