सांखळी-होंडा परिसरात दांडीया कार्यक्रमाना चांगला प्रतिसाद
सांखळी : सांखळी मतदारसंघ तसेच होंडा परिसरात नवरात्रोत्सव निमित्त दुर्गा देवीचे पूजन आणि दांडीया नृत्य तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.त्यात चिमुकल्या मुलांची नृत्य धूम पाहायला मिळत आहे. तसेच युवावर्ग व जेष्ठ नागरिक ही मोट्या उमेदीने दिडिया खेळताना पाहायला मिळतात.आता दिडिया, गरबा नृत्या कडेही संस्कृती म्हणून पाहिले जाते म्हणूनच वेळेची मर्यादा, मुलांचा अभ्यास याचा विचार करून आयोजक रात्री 8 ते 10 या कालावधीत दांडीया नृत्य कार्यक्रम घेताना पाहायला मिळले.तर काही ठिकाणी तालुका पातळीवर विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यास चांगला प्रतिसाद लाभला
नवरात्रोत्सव आणि नऊ रंग
नवरात्रोत्सव हा महिलांना विविध क्षेत्रात शक्ती प्रधान करणारा सण असुन वाईट शक्तिचा वध करण्याची शक्ती व नव चेतना फुलवणारा सण आहे.त्यात नऊही दिवस रंगात रंगून कपडे परिधान करून महिला समाजात आपली एक नवी ओळख निर्माण करत असते आणि यात तिला पती, मित्र, वडील, आजोबा, काका, मामा,शिक्षक हे सर्व पुऊष सहकार्य करतात. चिमुकली मूल, युवावर्ग ही नऊरंगात दिसता आहे.रंग हा सामाजिक संस्कृतीचा भाग समजला जातो.
ग्रामीण भागातील नवरात्रोत्सव
ग्रामीण भागात घटस्थापना झाल्यावर गावातील मंदिरात दसरा येई पर्यंत देवीला नविन कपडे परिधान करून सजवले जाते, भजन, कीर्तन, इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात यांस भक्त मंडळींचा ही चांगला प्रतिसाद लाभतो.तसेच काही मंदिरात दसरा उत्सव ही मोठ्या उमेदीने साजरा करण्यात येत आहे.गावची परंपरा जपण्राया या उत्सवाती शस्त्र पूजनाला फार महत्त्व आहे.आपण आपल्या रोजच्या कामात उपयोग करणारी सर्व शस्त्र पुजली जातात.या दिवसात झेंडूच्याफुलांना जास्त मागणी होती.
सरस्वती पूजन हा चिमुकल्यान महत्त्वाचा कार्यक्रम
नवरात्रोत्सवात साजरा होणारा सरस्वती पूजन हा चिमुकल्या मुलांसाठी अति महत्त्वाचा उत्सव आहे. विद्या आणि विध्यार्थी या मधले अतुल नाते सांगणारा हा उत्सव विद्येच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास ती आपली सोबत कधीच सोडत नसते अशी मान्यता आहे. ती विश्वाची चालक शक्ती आहे.म्हणूनच प्रत्येक शाळेत, गावातील मंदिर तिची उपासना केली जाते. दीड, तीन, आणि पाच दिवस चालण्राया या कार्यक्रमात चिमुकल्या मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात म्हणून मुलांसाठी सरस्वती पूजन महत्त्वाचे आहे असे जाणकार सांगतात.









