पोर्ले तर्फ ठाणे
कोल्हापूर हे पर्यटनासाठी आणि नविन हॉटेल्ससाठी सर्वात पसंतीचं डेस्टीनेशन आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून लोक कोल्हापूरला भेट देत असतात. पण शहरात आणि हॉटेल्समध्ये वाढलेल्या गर्दीमुळे हौशी खाद्यप्रेमी आणि निसर्गप्रमींना कोल्हापूरचा पुरेपूर आस्वाद घेता येत नाही. कोल्हापूरचा अस्सल ग्रामिण बाज जोपासून पर्यटकांना आपली उत्कृष्ट सेवा देणारे ‘रानवारा ॲग्रो फार्म अँन्ड रिसॉर्ट’ हे पसंतीचे उतरले आहे.

केर्ले करवीर येथील मानेवाडी परिसरात नुकत्याच सुरू झालेल्या ‘रानवारा ॲग्रो फार्म अँन्ड रिसॉर्ट’ नेहमीच पर्यटकांना आणि खाद्यप्रेमींसाठी अनेक इव्हेंट सादर करत असते. त्यापैकीच नवरात्रीनिमित्त दि.15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दांडिया व गरबा आयोजित केला असून त्यासाठी सर्वांसाठी चक्क मोफत प्रवेश ठेवला आहे. डिजे तालावर होणाऱ्या या गरबा आणि दांडियाला नोंदणीसाठी तरूणाईचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
कॉलेज स्टाफ व विद्यार्थी यांच्यासाठी स्पेशल डिस्काउंट ऑफर व मोफत प्रवेश 31 डिसेंबर पर्यंत ठेवण्यात आला आहे. या रिसॉर्ट मध्ये पिकनिकच्या विवीध सुविधा उपलब्ध असून वाढदिवस व लग्नाच्या वाढिवसानिमित्त विविध सुविधा ठेवल्या आहेत याचा लाभ घेण्यासाठी 8320145847 व 9110454827 या नंबरशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









