एम. स्टाईल्स ग्रुपचे यश
प्रतिनिधी/ बेळगाव
बँकॉक येथे नुकत्याच झालेल्या जागतिक डान्स चॅम्पियनशीप नृत्य स्पर्धेत बेळगावच्या एम. स्टाईल्स ग्रुपने ब्राँझ पदक पटकाविले. या स्पर्धेत जगभरातून 1100 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पहिल्या फेरीत सर्व कॅटेगरीमधील स्पर्धकांना मागे टाकून 265 स्पर्धकांमध्ये ग्रुपची निवड झाली. त्यातूनही अंतिम फेरीसाठी त्यांची निवड झाली. अंतिम फेरीत झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेत कॅटेगरीप्रमाणे या ग्रुपने टॉप 20 मध्ये तिसऱया क्रमांकावर येऊन ब्राँझपदक पटकाविले.
अकॅडमीचे विद्यार्थी प्रेरणा गोणबरे, पार्थ गोणबरे, सेजल खंदाळे, वैष्णवी माळगी, माही माळगी, अस्मिता कळ्ळीमनी, संजना चव्हाण, सानवी मुंगारे, क्रितिका गावडे, प्रथमेश मिसाळ, महषी शेखन्नावर या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. बेळगावबरोबरच भारत देशाला ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नृत्य प्रशिक्षक महेश जाधव यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे.









