पक्ष संघटना मजबूत करण्यास प्राधान्य
मडगाव : भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष दामू नाईक यांनी काल गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान, गोव्यात भाजप संघटना अधिक मजबूत करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण पाठिंबा दिल्याची माहिती दिली. दामू नाईक यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीच्या दरम्यान, उभयतांमध्ये गोव्यातील विविध घडामोडीवर चर्चा झाली. गोव्यात भाजपची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रातून पूर्ण पाठिंबा मिळणार असून सर्वांना सोबत घेऊन जोमाने कार्य करण्याचा सल्ला ही यावेळी अमित शहा यांनी दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन आगामी काळात सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास दामू नाईक यांनी व्यक्त केला आहे. अमित शहा यांच्याशी झालेली चर्चा फलदायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









