वार्ताहर/येळ्ळूर
अनगोळ येथील दिलीप दामले हायस्कूलच्या वार्षिक क्रीडास्पर्धा मोट्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मल्लिकार्जुन विद्यापीठाचे संस्थापक जी. एम. पाटील होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण झाल्यानंतर क्रीडाज्योत मान्यवरांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेण दिव्या नाईकने खेळाडूंना शपथ दिली. जी. एम. पाटील यांनी शालेय जीवनात खेळाचे महत्त्व सांगून खेळाचा आनंद घ्या, असे सांगितले. यावेळी वेगवेगळया क्रीडाप्रकारच्यास्पर्धा उसाहात झाल्या. प्रास्ताविक व स्वागत प्रभारी मुख्याध्यापक एच. बी. पाटील यांनी केले. सुत्रसंचालन शामल पाटील यांनी व आभार भाग्यश्री कंग्राळकर यांन मानले.









