न्हावेली / वार्ताहर
मळेवाड सावळवाडी येथील गोविंद महादेव सावळ यांच्या माड बागायतीत मुसळधार पावसामुळे चिखलाचे पाणी घुसुन मोठे नुकसान झाले आहेत.गेले दोन तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने डोंगरमाध्यावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येत असून ती शेतीत घुसत असल्याने मोठे नुकसान होत आहे.गेल्यावर्षी सावळ यांच्या माड बागायतीत असेच मातीचे पाणी घुसुन नुकसान झाल्याने त्यांनी याबाबत नुकसानी बाबत महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली होती.मात्र त्यावर वर्ष उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सावळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Previous Articleआचरा- काझीवाडा येथे घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान
Next Article आंबा-घोळसवडे मार्गावरील पाणी होऊ लागले कमी









