बंदोबस्ताची शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
शिंदोळी परिसरात असलेल्या शिवारात खेचरांचा वावर वाढला आहे. उभ्या पिकात खेचर धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मुतगा येथील पांडुरंग यल्लाप्पा पाटील यांच्या शिवारातील ऊस, भात, कोबी, सोयाबीन पिकांचे खेचरांनी नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना फटका बसला आहे. संबंधित खेचरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱयांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून हे खेचर शिवारातील पिकांचे नुकसान करत आहेत. अधून-मधून उभ्या पिकामध्ये शिरून पिके फस्त करत आहेत. याबाबत कित्येकवेळा तक्रार देऊन देखील ग्राम पंचायत आणि संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. सातत्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी खेचरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही स्वतःच त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देखील शेतकऱयांनी दिला आहे.









