सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यात सह्याद्री पट्ट्यातील शिरशिंगे येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पडलेल्या पावसात काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माजी सैनिक बापू शिवराम राऊळ यांच्या घरावर वीज पडून घरातील घरगुती उपकरणांचे किरकोळ नुकसान झाले आहे. श्री राऊळ, घरातच होते . मात्र सुदैवाने त्यांना कोणताही धोका पोहोचला नसून किरकोळ दुखापत झाली आहे.









