वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे चव्हाट गल्लीमध्ये एक संपूर्ण घर कोसळले. तर त्याला लागून असलेल्या दुसऱ्या घराचीही भिंत कोसळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण घर जमीनदोस्त झाले आहे. यल्लाप्पा मारुती पाटील यांचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले आहे. तर त्याला लागून असलेले कै. गजानन व्यंकट पाटील यांच्या घराचीही भिंत कोसळली आहे. तलाठी व ग्राम पंचायत सदस्यांनी सदर दोन्ही घरांची पाहणी केली. शासनाने दोन्ही घरमालकांना नुकसानभरपाई मंजूर करून दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.









