चौके । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील चौके थळकरवाडी येथे गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान वंदना बाळकृष्ण गावडे व प्राची प्रशांत कुबल यांच्या घरावर जीर्ण झालेला भलामोठा वटवृक्ष कोसळून दोन घरांचे सुमारे लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे .तरी शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.









