अन्य दोन घरांच्या भिंतीही कोसळल्या : नुकसानभरपाईची मागणी
वार्ताहर /किणये
गेल्या तीन दिवसापासून संततधार पावसामुळे कर्ले येथील शिवाजी लक्ष्मण पाटील यांचे घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री हे घर कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवाजी लक्ष्मण पाटील यांच्या घराची एक भिंत कोसळली तसेच त्यांच्या बाजूला लागून असलेल्या दोन भिंतीही कोसळल्या. यामुळे त्यांचे सुमारे 60 टक्क्याहून अधिक घर कोसळले आहे. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना शासनाकडून आार्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. दादा गुरव व इतरांनी घराची जाऊन पाहणी केली.









