प्रतिनिधी /पेडणे
पालये येथे सोमवारी पडलेल्या पावसामुळे दुपारी भले मोठे भेंडीचे झाड वीज खांब व वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज खात्याचे मोठे नुकसान झाले.
पेडणे अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे हवालदार फटू नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चालक शैलेश हळदणकर, जवान श्याम आरोंदेकर, सहदेव चोडणकर आणि आशीर्वाद गाड हे जवान घटनास्थळी दाखल झाले. लगेचच वीज खांबावरचे व वीज वाहिन्यांवरचे झाड कापून रास्ता सुरळीत केला.









