जवळपास 19,000 कोटी रुपयांचा खर्च करण्याची तयारी : देशातील चौथी मोठी सिमेंट कंपनी
नवी दिल्ली :
देशातील चौथी सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी दालमिया इंडिया 2031 पर्यंत आपली सिमेंट क्षमता वार्षिक 12 कोटी टनांपर्यंत वाढवण्यासाठी सुमारे 19,000 कोटी रुपये खर्च करणार आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्राच्या भरभराटीमुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागते आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत दालमिया यांनी ही माहिती दिली.
सध्या कंपनीचे 14 सिमेंट प्रकल्प आणि ग्राइंडिंग युनिट्स 10 राज्यांमध्ये असून ज्यांची उत्पादन क्षमता 4.11 कोटी टन प्रतिवर्षी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, जेपी ग्रुपची मालकी घेतली होती. वार्षिक 9.4 लाख टन सिमेंट क्षमता असणारा जेपीचा उद्योग 5,666 कोटी रुपयांना दालमियाने विकत घेतला आहे.
आपल्या नवी दिल्लीतील कार्यालयात एका मुलाखतीदरम्यान, दालमिया म्हणाले की, या संपादनामुळे आम्हाला मध्य भारत आणि उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये सिमेंट व्यवसाय विस्तार करता येणार आहे.
दालमिया म्हणाले की भारत पुढील दशकात पायाभूत सुविधांमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करेल आणि यामुळे सिमेंटची मागणी लक्षणीय वाढेल.
भारत सरकार पायाभूत सुविधांना प्राधान्य देत असून गृहनिर्माण प्रकल्पांनाही गती प्राप्त झाली असून येणाऱ्या काळात सिमेंटची मागणी वाढणार असल्याचे सांगत तेव्हा उत्पादन क्षमता वाढवणे फायद्याचे ठरणार आहे.
पायाभूत सुविधांसाठी सरकारचा प्रयत्न
भारत सरकार पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 10 लाख कोटी रुपये खर्च करत असल्याने सिमेंटची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. सिमेंट उद्योगाला गती घेण्याची योग्य संधी आली आहे.
दालमिया म्हणाले की 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर खासगी क्षेत्राच्या भांडवली खर्चात मोठी वाढ असेल. आम्ही इतिहासातील आमचा सर्वात मोठा भांडवली खर्च करत आहोत. आम्ही सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून अधिग्रहण केले आहे आणि जेपी मालमत्ता संपादन करण्यासाठी आणखी 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही ईशान्य भारतात 4,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचीही तयारी केली आहे. या गुंतवणूकीची भविष्यात खूप फायदा होणार असल्याचा दावाही यावेळी केला आहे.
या वर्षी जानेवारीपासून सिमेंट कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत सुधारणा झाली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.









