समुद्रकिनाऱ्यानंतर आता डोंगर, माळरान, शेतजमिनी, पडिक जमिनींवर नजर : जमिनींचे दर भिडले गगनाला
पेडणे : पेडणे तालुका मोरजी, मांद्रे, हरमल, केरी – तेरेखोल या समुद्रकिनाऱ्यामुळे जगप्रसिद्ध आहेच त्याबरोबरीने आता मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आयुष इस्पितळामुळे पेडणे तालुक्यातील जमिनीकडे देशभरातील मोठ्या धनाढ्या लोकांची नजर वळली आहे. पेडणेतील पडीक जामिनी, डोंगर, माळरान यांच्यावर आता दिल्लीवासियांच्या तसेच इतर परराज्यातील दलालांची नजर आहे. सध्या पेडणे तालुक्मयात जमीन माफियांनी डोंगर, काजू बागायती, रानं आणि पडीक जमिनी घेण्याचा सपाटा लावला आहे. मोपा विमानतळामुळे पेडणे तालुक्मयाची आता विकसनशील तालुका म्हणून ओळख झाली आहे. मोपा विमानतळाच्या आसपासच्या परिसरात आपला व्यवसाय थाटण्यासाठी अनेक परराज्यातील उद्योजक आता जमिनी खरेदी करत आहेत. खास कऊन दिल्लीतील धनिक आणि व्यवसायिक हे जमिनी विकत घेत आहे. पेडणे तालुक्मयातील जमिनी विक्रीचा सपाटाच जणू सुऊ झाला आहे. सोमवार ते शुक्रवार पेडण्याच्या सरकारी संकुलात जमिनीचे व्यवहार करण्यासाठी, म्युटेशनसाठी तसेच अन्य जमिनीचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिल्लीवाल्यांचे एजंट तसेच वकीलांची वर्दळ असल्याचे चित्र दिसत आहे.
पेडणे निसर्गरम्य तालुका म्हणून असलेली ओळख पुसली जाणार?
एकेकाळी पेडणे तालुक्याची शांत आणि निसर्गरम्य तालुका म्हणून ओळख होती. शेतीप्रधान तालुका म्हणूनही पेडणे तालुका नवाजलेला होता मात्र गेल्या पाच-सहा वर्षात मोपा विमानतळ, आयुष इस्पितळ या प्रकल्पांमुळे पेडणे मतदारसंघातील जमिनी घेण्याकडे जमीन माफियांच्या नजरा लागलेल्या आहेत. पूर्वी हरमल, मोरजी, मांद्रे, केरी तेरेखोल आदी गावातील समुद्रकिनाऱ्या शेजारील डोंगरभागातील जमिनाही दिल्लीवासियांनी विकत घेतल्या आहेत. आता त्यांच्या नजरा कोरगाव, धारगळ, वाराखंड – नागझर, तोरसे, वजरी, चांदेल -हसापूर पंचायत क्षेत्रातील आणि अन्य पंचायत क्षेत्रातील जमिनीकडे गेलेले आहेत.
जमिनीचे दर भिडले गगनाला
यापूर्वी हरमल, मोरजी, मांद्रे या भागातील जमिनीचे दर प्रतिचौरस 10 हजार ऊपये ते 15 हजार ऊपये मीटर सुऊ होते मात्र आता त्यांचे दर गगनाला भिडले असून सर्वसामान्य गोमंतकीय नागरिकाला जमीन घेऊन एक छोटेस घरकुल बांधणेही कठीण झाले आहे.
कुळ, मुंडकारांना विश्वासात न घेता जमिनींची विक्री
या भागातील जमिनी आता जमीन मालक तसेच जे भटकार आहेत ते पैशांच्या हव्यासापोटी परराज्यातील लोकांना विकण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. त्यांना भरमसाठ पैसा मिळत आसल्याने हे लोक आता आपल्या जमिनी कुळ मुंडकार यांना न जुमानता कायद्याचा बडगा दाखवत आणि दादागिरीची भाषा करत परस्पर दिल्लीवाल्यांना विकत आहेत. ज्यांनी या जमिनी राखून ठेवल्या त्या कुळांना तसेच मुंडकारांना विश्वासात न घेता परस्पर या जमिनीचे सौदे केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग माळरान घेऊन त्या ठिकाणी रस्ते बनविले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षा रक्षक ठेवूनही काही ठिकाणी जमीन माफीया आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. आज पेडणे तालुका एक जागतिक स्तरावर मोपा विमानतळा मुळे त्याची ओळख झालेली आहे. यापूर्वी समुद्रकिनाऱ्यामुळे त्याची ओळख होतीच मात्र त्याचबरोबर पेडणे तालुक्मयात आणि खास करून पेडणे मतदारसंघात उतरणारे देशी तसेच विदेशी पर्यटक यांच्या नजरा आता या निसर्गरम्य डोंगर तसेच रानमाळावर गेलेली आहे. अनेक शेती जमिनी ज्या पूर्वजांनी पिढीजात टिकून ठेवली होती जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला ही जमीन मिळेल मात्र त्यांची मुले नातवंडे ही जमीन आता परस्पर विकण्याचा घाट घालत आहे. पैशाच्या मोहापोटी दिल्लीवाल्यांना या जमिनी विकण्याचा सपाटा लावत असल्याचे दिसत आहे.
दिल्लीवाल्यांची खास बडदास्त
पेडणे येथील सरकारी संकुलात जमिनी खरेदी केलेल्यांची तसेच जमीन माफिया आणि दलाल यांची खास बडदास्त ठेवली जाते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जमिनीचे कागदपत्रे, व्यवहार करण्यासाठीच खास करून कर्नाटक, मुंबई, दिल्ली, हरियाणा आदी राज्यातील नोंदणी असलेली वाहने आणि त्यांचे एजंट तसेच वकील यांची वर्दळ पेडणे येथील सरकारी संकुल कार्यालयात वाढली आहे. काही अधिकारी, राजकीय प्रतिनिधीही त्यांच्या सेवेसाठी सतत कार्यरत आहेत तसेच दिल्लीवाल्यांची कामे काही तासांतच होतात मात्र स्थानिकांना दिवसेंदिवस ताटकळत ठेवण्यात येते, अशी चर्चा सध्या पेडण्यात रंगलेली आहे. तसेच काही राजकारणी अधिकाऱ्यांकरवी लोकांवर जमिनी विकण्यासाठी दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे.
पेडणे स्थानिकांची की दिल्लीवासियांची?
मागच्या दहा वर्षांपूर्वी पेडणे तालुक्मयात जमिनीचे दर खूपच कमी होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षात हेच दर दुप्पट आणि चार पटीने वाढलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकाला तीनशे चौरस मीटर जमीन विकत घेऊन घर बांधण्याचे स्वप्न आता यापुढे अधुरे राहणार असल्याचेही नागरिक बोलत आहेत. भरमसाठ पैसे असलेले लोक घरे, बंगले बांधू शकतात मात्र इतरांचं काय? भविष्यात पेडण्याची ओळख आणि पेडणेकर यांचा अस्तित्व न ठेवण्यासाठी पेडणेकरच सौदेबाजी करत असल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पेडणे तालुका हा दिल्लीवाले तसेच परराज्यातील परप्रांतीच्या घशात जाणार असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली आणि परराज्यातील धनाढ्या लोकांना या जमिनी परस्पर विकल्याने त्यांचे दूरगामी परिणाम येणाऱ्या दिवसात सर्वसामान्यांना आणि पेडणे येथील जनतेला भोगावे लागणार आहेत. मोठ्या प्रमाणात जमिनी घेऊन त्या जमिनी परत मोठ्या प्रमाणात विविध व्यवसायासाठी मग ते गैरव्यवसाय असो, अमलीपदार्थसारखे व्यवसाय असो आणि अन्य व्यवसाय असो यासाठी वापरण्याचाही काही जणांचा इरादा असून त्यामुळे या जमिनी दाम दुप्पट दराने विकत घेण्यासाठी हे लॅण्ड माफिया सरसावलेले आहेत.









