डॉ. आंबेडकर उद्यानात मान्यवरांची उपस्थिती
बेळगाव : डॉ. आंबेडकर उद्यान येथे दलित संघर्ष समितीच्यावतीने (आंबेडकर वाद) ‘सोशितांच्या संघर्ष दिना’चे आयोजन करण्यात आले होते. दलित संघर्ष समितीचे राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मनपा आयुक्त शुभा बी., समाज कल्याण खात्याचे रामनगौडा कन्नोळी, भूमीपुत्र डी. संतोष, प्रा. श्रीकांत, युवा आघाडीचे भाऊराव गडकरी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे साहाय्यक व केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, अॅड. आनंद सुंदरीमनी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार उपस्थित होते.
‘शिका आणि संघटित’ होण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मनपा आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलीत करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. दलित संघर्ष समितीच्यावतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त शुभा बी. व भूमीपुत्र संतोष यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षाबद्दल माहिती देण्याबरोबर ‘शिका आणि संघटित’ होण्याचे आवाहन केले. यावेळी नागेश कामशेट्टी, संतोष तळवार, सागर कोलकार, दीपक धबाडे, लक्ष्मण कांबळे, भैरू मेत्री, निंगाप्पा कांबळे, रामा चव्हाण, भरमाण्णा कांबळे, अनिल कांबळे, संतोष कांबळे, कृष्णा कोलकार, कल्लाप्पा नाईक, सुरेश कांबळे, आनंद कोलकार, कल्लाप्पा मैलण्णावर, शेखर ऐनावर, राजू कोलकार आदींसह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









