सबबीटअंतर्गत पोलिसांकडून उपक्रम
बेळगाव : काळी आमराई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दलित समाजाच्या समस्या निवारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने बैठकीला सुरुवात करण्यात आली. कॉलनीतील समस्या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पुजेर, रुक्मिणी, एल. के. पाटील, डी. बी. द्यामण्णावर हे अधिकारी उपस्थित होते. मातंग गृहनिर्माण सहकारी संघाचे राम घाटगे, दयानंद माने, जी. एस. तिरकण्णावर, गणेश रोकडे, मनोज चौगुले, निखिल चौगुले आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बैठकीत उपस्थित होते.









