सातारा प्रतिनिधी
फलटण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली असून एका पिता- पुत्रांनी लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून दलित समाजातील माय- लेकींना जोरदार मारहाण करून वस्त्रे फाडल्याची घटना शनिवारी घडली असून ती आज उघडकीस आली आहे.
फलटण तालुक्यातील एका गावात लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून दोन मायलेकींचा गावातीलच एकनाथ तोडकर आणि त्यांचा मुलगा विनोद तोडकर यांच्याशी वाद झाला होता. त्या रागातून तोडकर पिता- पुत्रांनी या माय लेकींना त्यांचे अंगावरील कपडे फाटे पर्यंत मारहाण केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद आद्याप पोलीस स्टेशनमध्ये झाली नव्हती. पण विविध संघटनांनी दबाव टाकल्याने एफआय़आर फलटण पोलिसांत नोंदवला गेला आहे.