सांगली : प्रतिनिधी
थोर महापुरुषांच्या विरोधात अपमान कारक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सांगलीत दलित महासंघाने निषेध व्यक्त केला.
आक्रमक झाले आहे. यावेळी काही दिवसापुर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून दलित महासंघ आक्रमक झाला आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत सांगलीमध्ये दलित महासंघाने पाटील यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांचा दलित महासंघाकडून निषेध करण्यात आला तसेच गाढवाच्या प्रतिमेला चंद्रकांत पाटलांचा फोटो लावून चंद्रकांत पाटलांचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलीस ठाण्यानं चौख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.








