खर्चाला फाटा देऊन केला सामाजिक उपक्रम राबवला असल्याने कौतुक
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोळकवठाचे पोलीस पाटील धर्मराव कोळी यांनी मतिमंद जिव्हाळा शाळेमध्ये मुलीचा वाढदिवस साजरा केला. खर्चाला फाटा देऊन केला सामाजिक उपक्रम राबवला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
बोळकवठा पोलीस पाटील यांनी आपल्या मुलगी श्रावणी हिचा वाढदिवस अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील “जिव्हाळा शेतकी कर्मशाळा” येथील मतिमंद मुलांच्या सोबत साजरा करण्यात आला तसेच खाऊ वाटप करण्यात आले. येथे वय वर्षे १८ ते ६५ वय गटातील मतिमंद पुरुष होते.
या सर्वांना वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचा आनंद द्विगुणित झाला सर्व खुश झाले. यावेळी तेथील सर्व स्टाफ वडापूर,विंचूर, अंत्रोळी,कुरघोट, गावडेवाडी व औराद पोलीस पाटील व औराद चे माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी उपस्थित होते.








