सावंतवाडी । प्रतिनिधी
विझ इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटींग विझर्टने आयोजित केलेल्या राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत गोव्याचा दक्ष क्षितिज परब याने उल्लेखनीय यश मिळवत देशात ७वा क्रमांक पटकावला आहे. किड्स किंगडम इंटरनॅशनल स्कूल, पर्वरी येथे इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या दक्षने देशभरातील सुमारे ३ लाख स्पर्धकांमध्ये हे स्थान मिळवले आहे.त्याच्या या कामगिरीबद्दल गोवा सेक्रेटरीएट येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. हे यश केवळ दक्षचेच नाही, तर त्याचे सावंतवाडी शहरातील पालक ॲड. क्षितिज परब आणि अनुराधा परब यांच्यासह आजोबा ॲड. प्रकाश परब आणि आजी उषा परब यांच्यासाठीही अभिमानास्पद आहे.दक्षच्या या यशाने गोव्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उंचावले आहे.









