राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य हे 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत दोन दिवस पर्यटक व अभ्यासक यांना बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) एच. एस. पदमनाभा यांनी दिली आहे.
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवारेडा व इतर प्राण्यांच्यासाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी महाराष्ट्रतुन हजारो पर्यटक हे अभयारण्य पहायला येत असतात. 31 डिसेंबर वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाने या दोन दिवसासाठी अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, मद्य पिणे, गाणी वाजवणे, प्लॅस्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या दोन दिवसात पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









