Health Tips: अयोग्यवेळी खाण आणि बदलती लाईफस्टाईल यामुळे बीपी, लठ्ठपणा, मधुमेह अशा आजारांना निमंत्रण आपण देत आहोत. खूप पैस खर्च करून महागडी औषधे घेतली जातात मात्र त्याचा तुम्हाला फायदा होईलच असे नाही. यासाठी नियमित काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. कोणत्या गोष्टी चला जाणून घेऊय़ा.

शरीर आणि मन निरोगी ठेवण्यात झोपेचा मोठा वाटा आहे. शांत झोपेमुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. कामावर लक्ष केंद्रित करू शकता. स्मरणशक्ती आणि पचनक्रियाही चांगली राहते. त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी मोबाईल, टीव्ही इत्यादीचा वापर टाळा. किमान 6 ते 8 तास झोप घ्या.

जर तुम्हाला कोलेस्टेरॉल, मधुमेह, हृदयाच्या समस्यांसारखे धोकादायक आजार टाळायचे असतील, तर सर्वप्रथम तुमच्या आहारातून तेलकट, मसालेदार आणि जंक फूड पूर्णपणे वगळा. तसेच साखर आणि मीठाचे प्रमाण कमी करा. साधे अन्न खा, जे केवळ शरीरच नाही तर मन देखील निरोगी ठेवते . याचबरोबर खाण्याची वेळ निश्चित करा. यामुळे तुमचे वजन वाढणार नाही.

तुम्ही वर्कआउट करण्यासाठी दररोज 20-30 मिनिटे काढा. याचा फायदा तुम्हाला शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी होतो. तुमचे वय अनेक वर्षे वाढवू शकता. वर्कआऊट म्हणजे जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळणे असे नाही तर घरातील सामान्य कामे करूनही तुम्ही सहज फिट राहू शकता. त्यामुळे योगासने, दोरीवर उडी मारणे, चालणे यासारखे अनेक छोटे-छोट पर्याय तुम्ही वापरू शकता.

सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. सूर्यप्रकाश शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार करतो ज्याचा फायदा चांगल्या झोपेसाठी होतो. शिवाय थोडा वेळ उन्हात बसल्याने तणाव देखील दूर होतो. यासाठी नियमित शरीराला सूर्यप्रकाश घ्या.









