प्रतिनिधी /येळ्ळूर
पंढरपूरच्या आषाढी एकादशीला वारकरी मंडळी जाऊन आल्यानंतर श्री चांगळेश्वरी मंदिरासमोर दहीकाला साजरा करून प्रसादाचे वाटप केले जाते. यावषी हा दहीकाला मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. तरुणांनी मोठय़ा उत्साहात मडके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
पारंपरिक पद्धतीने दरवषीच दहीकाला साजरा केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अत्यंत साध्या पद्धतीने दहीकाला साजरा करण्यात आला होता. मात्र, यावषी हा दहीकाला मोठय़ा उत्साहाने साजरा केला गेला. आषाढी एकादशीला पंढरपूर वारीला जाऊन आल्यानंतर वारकऱयांनी हा दहीकाला साजरा केला. लाकडी ओंडक्मयाला मडके बांधून ते फोडले जाते. त्या मडक्मयामध्ये दही, दूध मोठय़ा भक्तिभावाने ओतले जाते. त्यानंतर ते मडके फोडले जाते. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास वारकरी संप्रदाय भजन म्हणत चांगळेश्वरी मंदिरासमोर आले. श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये पूजा-अर्चा करून त्यानंतर मडके लाकडी ओंडक्याला बांधण्यात आले. पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर तरुणांनी हे मडके फोडले. त्यानंतर चुरमुरे आणि बत्ताशा यांचा प्रसाद वाटून दहीकाला साजरा करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने तरुणाई उपस्थित होती.









