मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. गोविंदांसाठी सरकारने ३ निर्णय घेतले आहेत. यानंतर राज्यभरात आज दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ठाण्यातील टेंभीनाका येथील दहीहंडीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि अभिनेत्री श्रध्दा कपूर उपस्थित लावली. यावेळी श्रध्दा कपूर हिने अस्खलित मराठी बोलत गोविंदांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, टेंभी नाका आनंद दिघे साहेबांचा आहे. संस्कृती आणि परंपरा वाढवण्याचे काम त्यांनी केलं. दिघे साहंबांचं स्वप्न होतं एक दिवस तरी ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यांच्या बहिण अरूणाताईंनी सांगितल होतं. त्यांची दूरदृष्टी किती होती. आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला उपस्थित राहता आलं हे मी माझ भाग्य समजतो. हे सरकार गोविंदांचं आहे. गोविंदांसाठी १० लाखाचा विमा देण्यात आला आहे. पुढच्या वर्षापासून प्रो-दहीहंडी सुरु होईल असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही दिड महिन्यापूर्वी पन्नास थराची मोठी हंडी फोडली होती. हे थर आता वाढत जाणार आहेत. हे सरकार सर्वसामान्य़ांचे आहे. येथे सर्वांना न्याय दिला जाणार आहे. मुंबई-सुरत व्हाया गुवाहाटीला कामाका देवीच्या दर्शनाला लवकरच जाऊ असेही म्हणाले.
गेली अडीच वर्ष कोरोनामुळे कोणतेच सण साजरे झाले नाहीत. यंदा मात्र विघ्नहर्त्याने विघ्न दूर केलं आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सत्व, नवरात्र मोठ्या धुमधडाक्यात साजरा करूया. तसेच कोरोनाचे जरी निर्बध कमी केले असले तरी काळजी घेऊन सण साजरे करा असे आवाहनही केले.
Previous Articleएकरकमी एफआरपी द्यावीच लागेल – राजू शेट्टी
Next Article मुंबईत १२ गोविंदा जखमी, ७ जणांवर उपचार सुरू








